Tuesday, November 3, 2009









जगणे जुनेच आहे, तगणे जुनेच आहे, दुनिया नवी तरीही, बघणे जुनेच आहे...


Monday, November 2, 2009



झाला जरी सूर्यास्त राहतो तसाच प्रकाश...
आठवणी तशाच कायम राहतात संपला जरी सहवास..............




चहू दिशांना फिरवून मोहरा ..जागी घेतल्या गरगर गिरक्या
सप्तरंगी भिंगोऱ्यांत मना ..आभास आकळेना
मज आकाश सापडेना..मज आकाश सापडेना..!!

Friday, October 30, 2009




सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे....
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा,अबोल हा पारिजात आहे...




Monday, October 19, 2009



दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही..
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही 



कुणीतरी मग माझे होइन.. हात घेवुनी हाती ..
मिठीत घेवून मोजू चांदण्या कालोखाच्या राती ..
उधलूनी द्यावे संचित सारे आजवरी जे जपले..
साथ रहू दे जन्मो जन्मी असेच नाते अपुले.. 


आयुष्याचे क्षण सरता सरता मला नाती हवीशी वाटतिल..
ती दुरावलेली नाती तेंव्हा मला नकळत आठवणींमध्ये भेटतील ॥



शब्द ही अपुरे पडतात आता आपल नात मांडायाला, मुकेपना ही पुरतो आता मनातले भाव सांगायाला.... 


तुझ्या शब्दांनी माझे शब्द गुंफत गेले.. तुझ्या सुरांनी माझे गीत उमटत गेले..
मी तर कोणीच नव्हते तुझ्याविना.. तुझ्या प्रीतीने आयुष्य माझे फुलत गेले..
 

Tuesday, October 13, 2009



तुझ्या आठवणीत हरवल्यावर सगळे काही विसरायला होतं जागेपणीच मग येथे परीकथेत हरवायला होतं



तुझ असण तुझ नसण....जणू धुक्यात हरवलेली रानवाट....कधी धूसर कधी स्पष्ट....पण हवीहवीशी वाटणारी....हळवी श्रावण पहाट

Monday, October 5, 2009


तुझे आहे तुजपाशी हे जाणूनही आत्मशोध चालूच आहे...कुणास ठाऊक, कधी संपेल....अथवा, संपेल तरी का  ?

Friday, October 2, 2009




ओल्या दवबिंदू सारखे माझे मन. लागता चाहुल कोवळ्या ऊन्हाची, जाते त्यासवे मिसळून................

Sunday, September 27, 2009



नाही कळले प्रेम तुला, मी शब्दांतून मांडलेले. भावनांचे ते विलक्षण मोती, माझ्या हृदयातून सांडलेले. ...

Saturday, September 26, 2009



आयुष्य खुप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा, 



कुठून येतं फुलपाखरू..कुठे निघुन जातं ..चिमटीत उरतो रंग ..तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं….





मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला, जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला.


 स्वप्नात अजुनही आहे तू माझ्या ... आठवनितुन तू माझ्या जातच नाही ....
वेड़ हे मन माझं .. तुझ्याशिवाय चेहरयावर माझ्या हास्य फुलू देतच नाही...


एकाकी ही सांजवेळ आठवण तुझी घेऊन आली सुकलेल्या सगळ्या जखमा नव्याने ओल्या करुन गेली........!!!!!

Tuesday, September 1, 2009

 
Love is an unusual game.. Either there are two winners or none...

 
Love is what makes two people sit in the middle of a bench when there's plenty of room at both ends..

Monday, August 31, 2009


 

 चालण्यासठी वाट असते..वाटेसाठी चालणे नसते,
उंच भरारी मारणा-याला ..आभळाचे भान नसते.


आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं..त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं...

 
तुला भेटण्यासाठी मी ,एक एक क्षण मोजत आहे ,कस मी सांगू तुझ्याशिवाय ,इथे मी कशी जगत आहे ..


मी दंग राहते माझ्याशी , कधी शब्दांशी, कधी कवितांशी ..
मी अशीच आहे खुळी पौर्णिमा, दंग राहते चंद्राशी.. मी दंग राहते माझ्याशी !!



आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

 
पारिजातकाचं आयुष्य लाभल तरी चालेलं, पण लयलुट करायची ति सुंगधाचिचं ...

 
एवढ्याश्या आयुष्यात खूप काही हवे असते,पण हवे असते तेच मिळत नसते...हवे तेच मिळाले तरी खूप काही कमी असते, चांदण्या नि भरून सुद्धा आपले आभाळ रिकामे असते.


सप्तरंगी इंद्रधनुसारखे आयुष्य हवे असेल तर, पावसाचा ओलावा आणि सूर्याची धग एकत्र सोसण्याची तयारीही असावी.


हसायच्या आधी मला जरा सराव करावा लागतो,मनावरचा घाव  बराच दाबून धरावा लागतो  ...

;;